इटलीत PM मोदी गांधीजींपुढे नतमस्तक; लोकांकडून जंगी स्वागत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रोमला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी आज पियाझा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला वंदन केलं. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेणार आहेत. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोममध्ये युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांची भेट घेतली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोममधील पियाझा गांधी महात्मा गांधींच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी पोहोचले असता लोकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
#NarendraModi #G20 #PM #MahatmaGandhi #italy #India